ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दादर भूषण प्रकाशभाई मोहाडीकर यांनी स्थापन केलेल्या सानेगुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट या वैद्यकीय आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेला 20 वर्षे पूर्ण झाली. कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना आर्थिक मदत ग्रामीण व आदिवासी भागात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन हे कार्य सानेगुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट अखंडितपणे करीत आहे.
समाजाप्रती असलेले ऋणानुबंध कायम जपत सानेगुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट ही संस्था कार्य करीत आहे. या कार्याची दखल घेऊन झेड फाउंडेशन तर्फे 26 जानेवारी 2024 रोजी सानेगुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट या संस्थेचा गौरव करण्यात आला. यात संस्थेला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सानेगुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्टचे अध्यक्ष श्री महेंद्र ठाकूर यांनी उपस्थितांना संस्थेचा परिचय करून दिला. यावेळी संयुक्त सचिव स्वप्निल राऊत व सदस्य श्री सचिन बने व सौ मनीषा बने हे हजर होते.




Leave a Reply